Breaking News

धोकादायक विद्युत डीपीबाबत माजी नगरसेेविका दर्शना भोईर यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरातील उरण नाका येथील रस्त्यावर असलेली विद्युत डीपी धोकादायक परिस्थितीत असून नादुरुस्त झाली आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी अभियंता मोरे यांच्याशी संपर्क साधला आहे. लवकरच डीपीची दुरुस्ती करू, असे मोरे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या टपालनाका येथील कार्यालयाकडून विद्युत पुरवठा सुरळीत आणि योग्य मार्गाने व्हावा, यासाठी डीपी जागोजागी बसविल्या आहेत, मात्र विद्युत पुरवठ्याची जेवढी काळजी वितरण कंपनीने घेतली तेवढी खांब आणि डीपी देखभालीकडे नाही. उरण नाका येथील पनवेल उरण रस्त्यावरील विद्युत डीपी धोकादायक झाली असून एखाद्या वाहनाला जोरदार धडक बसून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी अभियंता मोरे यांच्याशी संपर्क साधला आहे. या वेळी मोरे यांनी तत्काळ कर्मचार्‍यांना पाठवून डीपीची दुरुस्ती करू, असे सांगितले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply