Breaking News

पांडुरंग आमले यांची भाजयुमोच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

नवी मुंबई : बातमीदार

सानपाडा नोडमधील समाजसेवक पांडुरंग आमले यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेली काही वर्षे सामाजिक कार्यातून जनसामान्यांत भाजपसाठी काम करणार्‍या पांडुरंग आमले यांच्या कार्याची भाजपकडून दखल घेण्यात आली असून त्यांची पोचपावती त्यांनी भाजयुमोच्या माध्यमातून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. कोरोना महामारीच्या काळात दोन वर्षे पांडुरंग आमले यांनी सातत्याने जनताभिमुख कामे करत जनतेत राहून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कोरोना महामारीच्या अगोदर, कोरोना महामारीत व कोरोना महामारीतही पांडुरंग आमले सानपाडा नोडमध्ये कार्यरत राहील्याने त्यांची सानपाडावासियांत चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांच्या निकवर्तीय समर्थकांमध्ये पांडुरंग आमले यांची गणना होत असून मंदा म्हात्रे यांचे विश्वासू म्हणून सानपाडा नोडमध्ये त्यांची प्रतिमा आहे. आमदार म्हात्रेंच्या माध्यमातून आमले सातत्याने सानपाडा नोडमधील समस्या सोडवत आले आहेत. त्यांच्या निवडीबद्दल आमदार म्हात्रेंपासून ते भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सानपाडा नोडमधील विविध गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकारी व रहिवाशी व अन्य सामाजिक संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply