Breaking News

भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात वार्षिक पदवी वितरण समारंभ शनिवारी (दि. 9) आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ विधीज्ञ तथा अ‍ॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष संजीव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते पदवी देऊन गौरविण्यात आले.
या समारंभाला पनवेल विधीज्ञ संघाचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, जनार्दन भगत शिक्षण प्रसरक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य तथा महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, कार्यकारी मंडळ सदस्य तथा नगरसेवक अनिल भगत, सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शितला गावंड, सीकेटी महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्यासह पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर ज्येष्ठ विधीज्ञ तथा अ‍ॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष संजीव कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तुम्ही जे वकिलीचे ज्ञान घेतले आहे ते तुम्ही आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात गेला तरी कधीच वाया जाणार नाही तसेच वकिलाला कधी बोलले पाहिजे, कधी उभे राहिले पाहिजे आणि कधी शांत बसले पाहिजे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला देऊन त्यांनी पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना भावी कालावधीत कशा रितीने पुढे जावे या संदर्भात मार्गदर्शन केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply