Breaking News

उरणच्या पाच वर्षीय चिमुरडीने केले कळसुबाई ‘सर’

उरणः प्रतिनिधी

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे उरण तालुक्यातील भेंडखळ गावची हर्षिती भोईर या पावणेपाच वर्षांच्या चिमुरडीने महाराष्ट्रातील सर्वात उंच असणार्‍या कळसुबाई शिखराला 7 जूनला गवसणी घालत हे अंतर अवघ्या साडेतीन तासांत पार  केले आहे. आता ती माऊंट  एव्हरेस्ट सर करण्याच्या तयारीत आहे. हर्षितीच्या या पराक्रमामुळे उरणसह भेंडखळ गावाचे नाव राज्यपातळीवर झळकवल्याने तिचे अभिनंदन होत आहे.

तालुक्यातील भेंडखळ गावचे कविराज भोईर व निवेदिता भोईर या दाम्पत्यांच्या हर्षितीला पहिल्यापासूनच ट्रेकिंगची आवड होती. हे आई-वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. हर्षिता साडेतीन वर्षांची असताना तिने रायगड किल्ला सर केल्यानंतरच तिचा खर्‍या अर्थाने ट्रेकिंगचा प्रवास सुरू झाला. हर्षितीने आजपर्यंत कर्नाळा, राजमाची, श्रीवर्धनगड, पालघरचा अशेरी त्याचप्रमाणे रायगड अनेकदा सर केले आहेत.

समुद्र सपाटीपासून 1664 मीटर उंच असणारे कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हा शिखर ट्रेकिंगसाठी मध्यम प्रकारातील असून ट्रेकर्सना आकर्षित करणारे असे शिखर आहे. मात्र अनुभवी ट्रेकर्सचीही दमछाक करणारे हे शिखर पावणेपाच वर्षांच्या चिमुरडीने न थांबता यशस्वीपणे चढाई करत सर केला. यामुळे अनुभवी ट्रेकर्सनाही अचंबित केल्याने यापुढे तिला बर्फ़ाचा  गड म्हणजेच माउंट एव्हरेट सर करायचा आहे, असे तीने आपल्या पालकांना सांगितले आहे. तर राज्यातील सर्व महत्वाचे आणि उंच शिखर सर करण्याची तयारी पालक तिच्याकडून करून घेत आहेत. यासाठी तिला आवश्यक त्या गोष्टी पुरवणार असल्याचे पालकांनी सांगितले.

   हर्षिती या चिमुरडीची जिद्द पाहता सर्वांनाच हेवा वाटत आहे. यामुळे उरणचे नाव उज्जवल झाले आहे. यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना नक्की काय हवे आहे, हे ओळखून त्याप्रमाणे त्यांना घडवलं तर नक्किची मुलं उंच शिखराला गवसणी घालतात, हे हर्षितीने सर्वांना दाखवून दिले आहे.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply