Breaking News

उरण महोत्सव उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

उरण : वार्ताहर

उरण येथे महेश बालदी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वूमन ऑफ विस्डम, स्टेप आर्ट कला क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था उरण, स्टोर्म फिटनेस आणि मिक्स मार्शल आर्ट आयोजक असून यांनी उरण महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. उरण महोत्सव 19 ते 22 जानेवारीदरम्यान झाला असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्य हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत महोत्सवात विविध कार्यक्रम झाले. आमदार महेश बालदी यांची कन्या नेहा महेश बालदी यांनी अभिनेत्री तथा नृत्यांगना मानसी नाईक यांना सन्मान चिन्ह (त्रिमूर्ती) देऊन स्वागत केले. स्टोर्म फिटनेस आणि मिक्स मार्शल आर्टचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली शरीर सौष्ठव स्पर्धा  घेण्यात आल्या. सोनी मराठी चॅनेलवरील महाराष्ट्रची हास्य जत्रेतील फेम गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता सम्भेराव, प्रथमेश बांगरे, चेतना भट, संतोष भांगरे मराठी अभिनेत्री तथा नृत्यांगना मानसी नाईक, अभिनेती सविता मालपेकर, अभिनेती दिव्या पुगावकर  आदि अभिनेते कलाकार यांनी उपस्थिती दर्शविली. सर्व कलाकारांचे स्मृतीचिन्ह देवून स्वागत करण्यात आले. नॅशनल लेव्हल मल्लखांब चॅम्पियन हसन अंसारी यांनीही उपस्थिती दाखविली. आमदार महेश बालदी, नीता महेश बालदी, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर भाजप अध्यक्ष कौशिक शाह, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी  नगरसेवक राजेश ठाकूर, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, भाजप नेते नीलकंठ घरत, चंद्रकांत घरत, कामगार नेते सुधीर घरत, नगरसेविका जान्हवी पंडित, हितेश शाह, मनन पटेल मदन कोळी, माजी नगरसेवक राजेश कोळी, मनोहर सहतिया, निखील माळी, हस्तीमल मेहता, सुनील पेडणेकर, अजित भिंडे, राजेश नाखवा, पप्पू सूर्यराव, सारिका पाटील, सिद्धेश शिंदे, निलेश कदम, परेश वैवडे, निवेदक नितेश पंडित आदी उपस्थित होते. निवेदक नितेश पंडित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply