Breaking News

आकुर्ली येथे दुचाकी अपघातामध्ये एक जण ठार

पनवेल : वार्ताहर

आकुर्ली येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोडपाली येथील बाबुराव बुधाजी पगडे (वय 52) हे त्यांची होंडा एक्टिवा मोटरसायकलने (एमएच 46 सीबी 5446) कामावरून घरी येत असताना माथेरान पनवेल मार्गावरील आकुर्ली येथील विघ्नहर्ता इमारतीच्या समोर अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने त्यांच्या एक्टिवा स्कुटीला धडक दिली. या धडकेत बाबुराव पगडे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अज्ञात व्हॅनचालकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply