Breaking News

खालापूरातील कलोते येथे बेकायदेशीर खनिज उत्खनन प्रकरणी दंडाची नोटीस

खोपोली : प्रतिनिधी

तालुक्यातील कलोते गावाच्या हद्दीत शेतजमीनीतून शासनाचा महसूल बुडवून दगड मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते याबाबत तलाठी सजा वावंढळ यांनी पंचनामा करून पाचपट दंडाची नोटीस पाठवली आहे .

खालापूर तालुक्यात  सध्या गृहप्रकल्प, रस्ते तसेच औद्योगिकीकरणामुळे जमिनीला आणि मातीला सोन्याचा भाव आला आहे. बांधकामासाठी डबर आणि भरावासाठी मातीची मागणी प्रंचड आहे. याचा फायदा माती माफिया  घेत असल्याने कारवाईची मागणी होत होती.

कलोते गावाच्या हद्दीत जवळपास दोन हेक्टर जागेत उत्खनन सुरू आहे. जेसीबी आणि पोकलनचा वापर करत मोठ्या प्रमाणात दगड आणि माती काढून डंपरमधून दिवसाढवळ्या वाहतूक सुरू आहे. शासनाची रॉयल्टी बुडवून कोणत्याही प्रकारची उत्खनन परवानगी न घेता अनाधिकृत पणे प्रंचड उत्खनन झाले होते. वावंढळ सजा तलाठी अमोल बोराटे यांनी घटना स्थळी जावून पंचनामा केला असता अनाधिकृत पणे दगड  खनिजांचे उत्खनन झाल्याचे लक्षात आले.

विनापरवाना 212 ब्रास दगड उत्खनन झाल्यामुळे पाचपट दंड आकारण्यात आला आहे. प्रती ब्रास 1 लाख 27 हजार 200 प्रमाणे स्वामित्व धन रकमेसह  19 लाख 57 हजार 78 रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. महसूलच्या या कारवाई नंतर अनाधिकृत पणे उत्खनन करणा-यांचे धाबे दणाणले असून अशीच कारवाई सुरू राहिल्यास शासनाच्या तिजोरीत रॉयल्टी रुपाने मोठी भर पडणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply