खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय शुक्रवारी (दि. 27) व्यवस्थापन शिक्षण विभागातर्फे प्रकल्प मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
व्याख्यानासाठी सायन येथील एस. आय. ई. एस. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अनन्या गोण या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. या व्याख्यानाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना ’ब्लॅकबूक प्रकल्प’ लिहण्यासाठी मार्गदर्शन करणे हा होता. कार्यक्रमाचे आयोजन व्यावसायिक व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख प्रा. रीत ठुले यांनी आयोजन केले व प्रा. रेवन शिंदे, डॉ. धनवी आवटे, प्रा. मीरा पटेल, प्रा. भाग्यश्री शुक्ला यांनी सहकार्य केले. प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी या व्याख्यानासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या व प्रोत्साहन दिले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …