Tuesday , March 28 2023
Breaking News

माथेरानमध्ये घोड्यावरून पडलेल्या पर्यटकाचा मृत्यू

कर्जत ः प्रतिनिधी

माथेरानमध्ये घोड्यावरून पडून जखमी झालेल्या पर्यटकाचा शनिवारी (दि. 28) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहम्मद काशीद इम्तियाज शेख असे या पर्यटकाचे नाव असून तो मुंबईचा राहणारा होता. मोहम्मद शेख, त्यांची पत्नी व मित्र असे चार जण 25 जानेवारीला माथेरानमध्ये फिरावयास आले होते. दुपारी दीडच्या सुमारास ते घोडेस्वारीसाठी तेथील हार्ट पॉइंटच्या दिशेने निघाले होता. त्या वेळी घोडा अचानक जोरजोरात पळू लागल्याने त्याच्यावर बसलेले मोहम्मद शेख खाली पडले. त्यांना आधी माथेरानमधील रुग्णालयात व नंतर उल्हासनगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात अपमृत्यू म्हणून नोंद झाली असून ही कागदपत्रे माथेरान पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply