Breaking News

खारघरच्या रामशेठ ठाकूर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

खारघर ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. 28) क्षितिज ः ड्रीम मिन्स रियालिटी या आशयाखाली वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप संगवे, बॉम्बे टीचर ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. भगवान बलानी, तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे. सौ. संगवे, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्सचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, माजी प्राचार्य के. जी. तपासे, सीकेटी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक श्री. सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेऊन विविध संस्कृतीचे दर्शन आपल्या नृत्यांमधून दाखवून दिले. वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना या वेळी गौरविण्यात आले. शैक्षणिक वर्ष 21-22मध्ये शंभर टक्के निकालासाठी परिश्रम घेणार्‍या शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले. प्राचार्य निशा नायर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सूत्रसंचालन दुर्गादेवी मोर्या व नमिता अखौरी यांनी केले. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वप्ना भांडवलकर, त्याचबरोबर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply