Breaking News

रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू

पेण ः प्रतिनिधी पेण रामवाडी ब्रिजजवळ रेल्वे अपघातात तीन जण ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. पेण चिंचपाडा येथील सुशील वर्मा (24), सुनील वर्मा (25) व निखिल गुप्ता (25) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे युवक शनिवारी रात्रीच्या सुमारास रामवाडी रेल्वे ब्रिजच्या पुढे वडखळ बाजूकडे स्टोन क्र. 104/2जवळ बसले असताना मालगाडीने त्यांना उडविले. अपघाताची माहिती मिळताच पेण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्यासह पेण पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सपोनि. महेश कदम अधिक तपास करीत आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply