Breaking News

महडच्या मुंगुर तलावप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

खालापूर : प्रतिनिधी
महड येथील मुंगुर तलावाबाबत सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अजया अनिल भाटकर (रा.102 ए वींग भक्ती डेव्हलपर्स ता. खोपोली) यांनी खालापूर नगरपंचायत हद्दीत महड येथे तीन आरोपी भाई काशिनाथ पाटील (रा. पेंधर, पनवेल), ए रहमान कर्जीकर आणि अनोळखी इसम याने भाडेतत्वावर घेतलेल्या तलावाबाबत नोटीस देवून मुंगूर माशांचे मत्स्य संवर्धन बंद करणेबाबत तसेच त्यांचा साठा शास्त्रीय पध्दतीने नष्ट करणेबाबत आदेश दिले होते. परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आरोपीनी केले. अखेरीस अजया भाटकर यांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अप्पर जिल्हा दंडाधिकारी रायगड यांच्या आदेशानंतर जाग आलेल्या मत्स्य व्यवसाय विकास विभागाने मुंगुर तलावावर कारवाईस सुरुवात केली असून महड येथील मुंगुर पालन करणार्‍या तिघां विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाण्यासाठी अपयकारक असलेला मुंगूर मासा प्रजनन खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर कारवाईची मागणी जोर धरत होती. या मुंगूर तलावप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार निलेश कांबळे
हे करीत आहेत.

कारवाईत सातत्य हवे!
तालुक्यात चौक कोपरी, धामणी, मोहपाडा, पौध भागात कित्येक एकरमध्ये मुंगुर पालन होत असून परिसरात हजारो तलाव आहेत. पन्नास ते साठ हजार एकरी भाडे तलाव मालकाना दिले जाते. आरोग्यास अपायकारक जलस्त्रोत दूषित तलाव पूर्णपणे बंद होण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाईत सातत्य आवश्यक आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply