Breaking News

खांदा कॉलनीतील नादुरुस्त पथदिवे तातडीने चालू करा -नगरसेवक संजय भोपी

पनवेल : रामप्रहर वृत्त – खांदा कॉलनी वसाहतीमधील नादुरुस्त पथदिवे तात्काळ दुरुस्त करावे व आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट व नवीन विजदिवे लावण्यात यावे, अशी मागणी पनवेल महानगरपालिका नगरसेवक व प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन दिले आहे. भोपी यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, खांदा कॉलनी वसाहतीत बहुतेक ठिकाणी पथदिवे बंद स्थितीत आहेत तर काही ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे स्थानिक नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून परिसरात चोरीच्या घटनाही वारंवार घडत आहेत याकरीता खांदा कॉलनी विभागातील सर्व नादुरुस्त पथदिवे तातडीने चालू करण्यात यावेत, तसेच आवश्यक ठिकाणी आणि खांदेश्वर मंदिर उद्यान परीसर, सेक्टर 6 व सेक्टर 9मधील उद्यान व परीसरातील विविध चौकांमध्ये हायमास्ट व पुरेसे नवीन विजदिवे लावण्यात यावेत, अशा मागणीचे लेखी निवेदन संजय भोपी यांनी दिले असून याबाबतीत त्वरित कार्यवाही करून नागरीकांची होत असलेली गैरसोय टाळावी अशी विनंती केली.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply