पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील बामणडोंगरी रेल्वे स्टेशन परिसरात एम. जे. डान्स क्रूच्या वतीने इंडिया डान्स किंग्स सोलो आणि ग्रुप चॅम्पियनशिप ग्रँड फिनाले स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 29)करण्यात आले होते. यंदाचे या स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. या इंडिया डान्स किंग्स सोलो आणि ग्रुप चॅम्पियनशिप स्पर्धेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारीउदघाटन झाले.
या स्पर्धेत वरळी येथील स्लम्झ इन स्ट्रीट क्रू ने प्रथम, पुणे येथील द फाइव्ह स्टारने द्वितीय कांदिवली येथील माईटी क्वीन्सने तृतीय क्रमांक तर सोलोमध्ये मुंबई येथील प्रदीप गुप्ता याने प्रथम, कांदिवली येथील हर्ष रावल याने द्वितीय तर पुणे येथील इशिता बारवाड हीने तृतीय क्रमांक पटकवला. बामणडोंगरी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणार्यास 61 हजार, द्वितीय क्रमांकास 31 हजार, आणि तृतीय क्रमांकास 15 हजार तर सोलो डान्स मध्ये प्रथम क्रमांक पटकविणार्यास 15 हजार, द्वितीय क्रमांकास 10 हजार तर तृतीय क्रमांकास 5 हजार देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी नंदराज मुंगाजी, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, किरण जगताप, अमित नाईक, मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कडू, मंगेश म्हात्रे, विशाल खोत, बारक्या कडू, प्रणय कडू, विकी घरत, क्रिष्णा पाटील, मंगेश म्हात्रे, प्रभाकर पाटील, मनोज नाईक यांच्यासह इतर पदाधिकरी उपस्थित होते.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …