Breaking News

नेरळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकावर गुन्हा दाखल

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील नेरळ ममदापुर येथील हावरे यांचा गृहप्रकल्प उभा राहत आहे. यासाठी बांधकाम करणारे मजूर देखील त्यांच्या गृहप्रकल्पाच्या आवारात राहत आहेत. या ठिकाणी काम करणार्‍या एका मजुराने येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याची घटना उघड झाली आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीत हावरे बिल्डिंग साईटवर राहणार्‍या कामगाराच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याची घटना घडली आहे. त्याच ठिकाणी राहणारी व्यक्तीकडून आर्थिक शोषण करण्यात आली आहे. दोन महिन्यापासून त्या मुलीवर धमकावून अतिप्रसंग केला जात होता. तेथील लोखंडी शेडमध्ये जबरदस्तीने रात्री अपरात्री ओढून नेवून अतिप्रसंग केले असल्याचा गुन्हा नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

बांधकाम साईटवरील मूळचा उत्तरप्रदेश येथील मजूर अनिल सिंग हा येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 1 नोव्हेंबर 2022 पासून  अत्याचार करीत होता. त्याच्या अत्याचाराला कंटाळलेल्या मुलीने अखेर घरच्यांसमोर हा प्रकार सांगताच तिच्या घरच्यांनी थेट नेरळ पोलीस ठाणे गाठले. नेरळ पोलिसानी घटनेची माहिती घेऊन नेरळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 19 / 2023 भा.दं.वि.क.376 , 376  (2)(न), बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम  4, 8, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपी अनिल सिंग यास नेरळ पोलिसांनी तात्काळ अटक केली. याबाबत अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक  करीत आहेत.

Check Also

कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा -मंत्री ॲड. आशिष शेलार

रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये कृतज्ञता मेळावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार पनवेल : …

Leave a Reply