Sunday , February 5 2023
Breaking News

नेरळमध्ये शौचालयाच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू

कर्जत : बातमीदार

नेरळ येथील शिंदेवाडी भागात शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू तसेच गुन्ह्याची नोंद केली आहे. धनीराम नामक कामगार 28 जानेवारी रोजी शौचालयाच्या टाकीत स्वच्छता करण्यासाठी उतरला होता. काम होऊनही मलमूत्राची दुर्गंधी बाहेर येतच असल्याने 31 जानेवारीला स्थानिक रहिवासी शौचालयाची टाकी पाहण्यासाठी गेले असता त्या टाकीत एक मृतदेह तरंगत असलेला दिसून आला. याबाबत नेरळ पोलिसांना कळविल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी तो मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृत इसम कुठे राहणारा होता, तसेच त्याला शौचालयाची टाकी स्वच्छ करण्याचे काम कोणी दिले याबाबत कोणतीही माहिती सध्या तरी उपलब्ध नसल्याने त्या इसमाच्या नातेवाइकांचा शोध घेणे कठीण झाले आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply