Breaking News

भाजपच्या केदार भगत यांचा वाढदिवस

सामाजिक उपक्रमांनी साजरा
पनवेल : वार्ताहर
भारतीय जनता पक्षाचे युवा नेते केदार भगत यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे झाला. वाढदिवसानिमित केदार भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवामोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, युवामोर्चा शहराध्यक्ष रोहित जगताप, कोषाध्यक्ष देवांशु प्रभाळे यांच्यासह युवामोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
युवा नेते केदार भगत आपला वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवा साजरा करत असतात. यंदाही त्यांनी पनवेल तालुक्यातील चिखले येथील आदिवासी शाळेमध्ये 540 विध्यार्थाना पोषक जेवणाचे वाटप करण्यात आले. केदार भगत मित्र मंडळाने आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच आगामी काळात शैक्षणिकदृष्ट्या भरीव मदत करणार असल्याची ग्वाही केदार भगत व मित्र मंडळाच्यावतीने देण्यात आली.
या वेळी गीतांजली केदार भगत, सुमित दसवंते, संकेत दसवंते, नितेश भगत, हर्षद गडगे, रवी परचे, सचिन जाचक, शेषनाथ गायकर, संतोष वर्तले, भावेश शिंदे, यज्ञेश पाटील, सार्थक भगत, ध्रुव भगत, योगेश साळवी, उज्वल पाटील तसेच केदार भगत मित्र परिवार उपस्थित होते.

Check Also

उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे …

Leave a Reply