Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून नारपोलीतील शाळेला संगणकाची भेट

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून नारपोली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत संगणक देण्यात आले आहेत. या संगणकाचे भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी वाटप करण्यात आले. या वेळी अरुणशेठ भगत यांनी सांगितले कि, आत्ताच्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी संगणक अत्यंत महत्वाचे आहे आणि ह्याचा लाभ घेउन सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारचे शिक्षण घ्यावे. या वेळी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सावळे माजी सरपंच अविनाश गाथाडे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply