Breaking News

द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात

एक ठार; तिघे गंभीर जखमी

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील मुंबई मार्गिकेवर गुरुवारी (दि. 16) मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास चार वाहनांचा अपघात झाला. त्यात अफकॉन कंपनीचा कर्मचारी ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी गुरुवारी रात्री अफकॉन कंपनीचा माल घेऊन एक ट्रक थांबला होता. त्याला पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने धडक दिली. यावेळी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या शैलेश शंकर गुडपले (वय 48, रा. लौजी, खोपोली) यांना अपघातग्रस्त ट्रकचा धक्का लागल्याने ते जागीच ठार झाले. त्याच वेळेस पाठीमागून आणखी तीन ट्रक येऊन या अपघातग्रस्त ट्रकला धडकले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी चार वाहनांचा अपघात होऊन अफकॉन कंपनीचे तीन कामगार  ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले होते.

 

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply