Tuesday , March 28 2023
Breaking News

महाड पालिकेच्या कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला आग

सुमारे 25 लाखांचे नुकसान

महाड ः प्रतिनिधी
महाड नगर परिषदेच्या लाडवली येथे असणार्‍या कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला शुक्रवारी (दि. 3) पहाटे वणव्यामुळे आग लागली. या आगीत केंद्रातील कचर्‍यासह त्यावर करायवच्या प्रक्रियेच्या यंत्रसामग्रीचे सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महाड शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणार्‍या लाडवली गावामध्ये पालिकेचे ओला व सुका कचरा विघटन प्रक्रिया केंद्र आहे. या ठिकाणी कचर्‍याचे वर्गीकरण व विघटन करून त्याची विल्हेवाट लावली जाते. सुमारे पाच टन क्षमता असणार्‍या या प्रक्रिया केंद्राच्या एका युनिटला शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता वणव्यामुळे आग लागली. शेजारच्या माळरानावर पेटत आलेला वणवा या प्रक्रिया केंद्रामध्ये शिरल्याने वर्गीकरण करून ठेवण्यात आलेल्या सुमारे तीन टन सुका कचर्‍याने पेट घेतला. कचरा पेटल्यानंतर ही आग वार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात वाढली व प्रक्रिया केंद्राच्या इतर भागांतदेखील पसरली. कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या सुमारे तीन यंत्रसामग्री यामध्ये जळल्या. त्यामुळे नगरपालिकेचे सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची घटना कळताच पालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, स्वच्छता व आरोग्य विभागाचे अभियंता परेश साळवी, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश पाटील व पालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी तातडीने रवाना झाले. सुमारे पाच तास प्रयत्न करून ही आग विझविण्यात आली.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply