Breaking News

ना. नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला नियोजनाचा आढावा

महाड ः प्रतिनिधी
केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली असून, ही यात्रा 23 आगॅस्टला रायगड जिल्ह्यातून पुढे तळकोकणात जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 20) पाली ते पोलादपूरदम्यान तयारीची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला.  
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाली, वाकण, नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड आणि पोलादपूर येथे दौरा करून पाहणी केली. त्यांच्यासमवेत दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, भाजप उपाध्यक्ष राजेश मापारा, रोहा अध्यक्ष सोपान जांबेकर, तळा अध्यक्ष निलेश रातवडकर, प्रदेश सचिव रवी मुंडे, जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply