लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे 75व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षानिमित्त युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर राबविण्यात येते. त्या अनुषंगाने खारघर मंडल भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रविवारी (दि.13) खारघरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात 97 नागरिकांनी उपस्थिती नोंदवली, तर त्यापैकी 70 जणांनी यशस्वीपणे रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली तसेच ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केेला.
या वेळी भाजपचे जिल्हा सरटिणीस नितीन पाटील, चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, अजय बहिरा, नरेश ठाकूर, गुरुनाथ गायकर, भाजपचे पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, खारघर मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे, सरचिटणीस अक्षय लोखंडे, वासुदेव पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, खारघर मंडळ अध्यक्ष नितेश पाटील, माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, प्रवीण रामजी बेरा, युवा अध्यक्ष आशिष कडू, अक्षय सिंग, समीर कदम, वासुदेव पाटील, अमर उपाध्याय, विजय पाटील, संतोष शर्मा, अक्षय सिंग, डॉ. विजय उजलंबे, आदित्य हातगे, योगेश पाटील, मयूर घरत, कोमल शिंदे, दुर्गा बन्सल, अभिजित देहाडे, सुमित देहाडे, प्रथम पाटील, सार्थक दोरुगडे, दिनेश यादव, अंकुर शर्मा, राहुल शिंदे, ध्रुव गजरा, अमित बोढई, स्नेहल बोढई, वैभव शेजवळ, संदीप माघाडे, निर्मला यादव, शोभा मिश्रा, अंकिता वारंग, कुणाल देवकर, मधुमिता जेना
व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चा, महिला मोर्चा व विविध विभागांतील स्वयंसेवकांनी अथक मेहनत घेतली. हा उपक्रम समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी अधोरेखित करणारा ठरला.
मान्यवरांकडून आयोजकांचे कौतुक
या शिबिरास पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष भेट देत, खारघर युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी महिला पदाधिकार्यांचे विशेष कौतुक करत, समाजसेवेत त्यांचा सहभाग प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही उपस्थित राहून, मानवतेसाठी व समाजाच्या ऋणातून प्रेरित झालेले रक्तदान हे अत्यंत पवित्र व निःस्वार्थ सेवा कार्य आहे, असे उद्गार काढले.
दानशूर व्यक्तिमत्त्व असलेल्या रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त, आज मला माझे 75वे रक्तदान करण्याचं भाग्य लाभलं, ही बाब माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक आहे.
-दीपक शिंदे, भाजप शहर सरचिटणीस, खारघर
RamPrahar – The Panvel Daily Paper