Tuesday , March 28 2023
Breaking News

‘मविआ’ने कोकणाला काहीच दिले नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार टीका

मालवण : प्रतिनिधी
शिवसेनेला कोकणाने खूप काही दिले, पण अडीच वर्षांमध्ये सत्तेत असताना शिवसेना महाविकास आघाडीने कोकणासाठी काहीच दिले नाही. उद्धव ठाकरेंचे कोकण प्रेम बेगडी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 4) विरोधकांवर शरसंधान साधले. ते आंगणेवाडी येथील जाहीर सभेत बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी येथील भराडीदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर सभेला संबोधित केले. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीवर टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोकणाला गेल्या सरकारकडून काहीच मिळाले नाही. कोकणाला दोन वादळांचा तडाखा बसला, पण नुकसानभरपाई सोडा, साधी मदतही त्यांनी दिली नाही.
कोकणात रिफायनरी प्रकल्प होईल. या प्रकल्पामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भरभराटीस येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पर्यटनदृष्ट्याही कोकणचा विकास करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आपला भारत बदलत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देश महासत्तेकडे घेऊन चालले आहेत. उद्धव ठाकरे तुम्ही अडीच वर्षांत कोकणासाठी काय केलंत? मला ह्यांच्या बर्‍याच गोष्टी माहीत आहेत. त्या उघड केल्या तर पळता भुई थोडी होईल.
-नारायण राणे, केंद्रीय मंत्री

Check Also

पळस्पे ते इंदापूर मार्ग काँक्रिटीकरणाचे गुरुवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या …

Leave a Reply