कार्यकर्त्यांनो संघटित व्हा -आमदार प्रशांत ठाकूर
श्रीवर्धन ः रामप्रहर वृत्त
येथील गोंडघर हनुमान मंडळ स्थानिक व मुंबई यांच्या समाजमंदिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 26) करण्यात आले. या वेळी भाजप दक्षिण रायगड अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आघाडी सरकार अतिशय चुकीच्या पद्धतीने काम करीत असून राज्यातील विकास खोळंबला आहे. आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असून मंडळातील सर्व सदस्यांनी संघटित व्हावे व कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे बदलत्या युगात तंत्रज्ञान स्वीकारून नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी या समाजमंदिराचा वापर करावा. या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष प्रकाश रायकर, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, माणगाव तालुकाध्यक्ष संजय ढवळे, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, सरचिटणीस सुनील शिंदे, महेश पाटील, शहर अध्यक्ष संतोष पानसरे, उपाध्यक्ष भाजप तथा सरपंच लहू तूरे, उपाध्यक्ष समीर धनसे, जिल्हा चिटणीस तुकाराम पाटील, भालचंद्र करडे, चिटणीस मनोहर जाधव, रमेश पोटले, गोविंद भायदे, महिला मोर्चाध्यक्षा सुनंदा पाटील, माणगाव महिला मोर्चा अश्विनी महाडीक, प्रियंका शिंदे, रुपा भायदे, उपस्थित होत्या. आशुतोष पाटील, किशोर भोईनकर, सुधाकर शिकेे, प्रशांत महाडीक, सुबोध पाटील, ग्रामीण अध्यक्ष जगन्नाथ तूरे, मुंबई मंडळ अध्यक्ष निलेश तूरे, महिला मंडळ अध्यक्ष वैशाली लहू तूरे, बुथ अध्यक्ष पंकज भाये यांनी सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.