Breaking News

इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर एकतर्फी मात; बटलरची फटकेबाजी

दुबई ः वृत्तसंस्था

टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 फेरीत विश्वविजेत्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला आठ गडी राखून मात देत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या इंग्लंडने जबरदस्त मारा करीत ऑस्ट्रेलियाला 125 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलरने 32 चेंडूंत नाबाद 71 धावा करीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसे काढली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचच्या 44 धावांव्यतिरिक्त इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. इंग्लंडकडून जलदगती गोलंदाज ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स आणि ख्रिस वोक्स यांनी तिखट मारा केला. 17 धावांमध्ये तीन बळी टिपणारा जॉर्डन सामनावीर ठरला.

12व्या षटकातच विजय

ऑस्ट्रेलियाच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी 66 धावांची भागीदारी केली. फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाने रॉयला वैयक्तिक 22 धावांवर बाद केले. रॉयनंतर डेव्हिड मलानही स्वस्तात बाद झाला. दुसर्‍या बाजूने बटलरने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने 32 चेंडूंत प्रत्येकी पाच चौकार आणि षटकारांसह नाबाद 71, तर बेअरस्टोने दोन षटकारांसह नाबाद 16 धावा केल्या. अशा प्रकारे इंग्लंडने 12व्या षटकातच विजय साकारला.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply