Breaking News

आमदार थोरवे यांच्या मध्यस्थीने निलंबित कामगार कामावर रुजू

खोपोली : प्रतिनिधी

सावरोली गावाच्या हद्दीतील टाटा स्टील या कारखान्यातील नऊ कामगारांना युनियन वादातून व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली होती तेव्हापासून नऊ कामगारांचा गेल्या दहा वर्षांमध्ये संघर्ष सुरू होता, अखेर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या यशस्वी मध्ये नऊ कामगारांना कामावर रुजू होण्या संदर्भातली माहिती आमदार थोरवे यांनी शिवालय संपर्क कार्यालयात कामगारांच्या कुटुंबाच्या उपस्थितीत दिल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे कामगारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार थोरवे यांचे आभार मानले आहे. सुनील दिसले, रुपेश पाटील, दत्तात्रय मिरगळ, सागर भुईकोट ,विश्वनाथ मुंडे, संदीप मिरगळ, अशपाक दुदुके ,अनिल पाठक, व कमलाकर मुर्गनेशन या कामगारांना युनियन नेतृत्व वादातून कामावरून निलंबित केले होते. केली दहा वर्ष हे कामगार वेगवेगळ्या माध्यमातून व्यवस्थापनाशी चर्चा करीत होते मात्र त्यास यश येत नव्हते. काही स्थानिक राजकीय नेत्यांकडून या कामगारांना कामावरच घेऊ नये अशा प्रकारची मोर्चे मांडणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती कामगार वर्गातून सांगण्यात येत आहे. सावरोली गावचे माजी सरपंच तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गोविंदशेठ बैलमारे यांच्या नेतृत्वाखाली सावरोलीचे ग्रामस्थ सदानंद घोसाळकर, बाबू तटकरे, मंगेश बांदल, रोशन पाटील ,रेश्मा अंग्रे ,संतोष घोसाळकर, अमर वादळ, अजय चौरे, इत्यादींनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची भेट घेऊन यात मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते रोहित विचारे, कर्जतचे नगरसेवक संकेत भाषे, खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील इत्यादी सह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply