Breaking News

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या शनिवारी (दि. 13) मुंबईत झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. संपर्कप्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक कौन्सिलशी संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 1982पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे, सचिवपदी भाई गिरकर, तर कोषाध्यक्ष म्हणून अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply