आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः वार्ताहर
कळंबोली येथील मायरा हेल्थ केअर, सिद्धिविनायक हॉस्पिटल व शिल्पा मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी गुरुवारी (दि. 9) भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. आरोग्य शिबिरामध्ये सामान्य शारिरिक तपासणी, बालरोग, स्त्रीरोग तपासणी, मधुमेह रूग्णांना विशेष मार्गदर्शन तसेच सीबीसी, शुगर, बीपी, वजन, उंची, बीएमआय आदी तपासण्या करण्यात आल्या व मोफत औषधे देण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी याठिकाणी भेट देऊन अत्यंत कमी वेळात अतिशय सुंदर उपक्रम राबविण्यात आला, याबद्दल रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे आणि सर्व पदाधिकार्यांचे कौतुक केले. मोफत आरोग्य तपासण्या सर्वसामान्य नागरिकांना भेटणे विषयी सुंदर काम कोणतेही नसून या अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे, असे प्रतिपादन केले. या वेळी प्रतिष्ठानचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरासाठी सिद्धीविनायक हॉस्पिटलचे डॉ. संजय कदम, डॉ. पल्लवी कदम व शिल्पा मेडिकलचे विवेक शिंदे यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अॅड. श्रीनिवास क्षीरसागर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, बाळासाहेबांची शिवसेनेचे कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक, निलेश दिसले, संजय शेडगे, महेश गोडसे, संभाजी चव्हाण, आबा लकडे, नाना मोरे, सागर मोरे, नारायण फडतरे, नितिन गुलदगड, इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचा कैवारी आणि सर्वसामान्य जनतेची नस उमगलेला नेता अशी ख्याती झालेली आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत, त्यांचा वाढदिवस साधेपणाने समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्या अनुषंगाने परिसरातील गरिब व गरजू रूग्णांना या आरोग्य शिबिराचा लाभ झाला, हे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे फलित आहे.
-रामदास शेवाळे,जिल्हासंपर्कप्रमुख,बाळासाहेबांची शिवसेना