अलिबाग : महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र शनिवारी (दि. 22) समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे, मात्र हे पत्र बनावट असल्याचे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रवक्ते तथा डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे. असे कुठलेही पत्र आप्पासाहेबांच्या वतीने जारी करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. कोणीतरी खोडसाळपणा करून यापूर्वी आप्पासाहेबांनी काढलेल्या पत्राचा वापर करीत त्यातील मूळ मजकुरात फेरफार करीत हे पत्र तयार केले आहे, असे पुढे बोलताना पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
Check Also
संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …