Breaking News

पिकअप टेम्पो पलटी झाल्याने सहा जण गंभीर जखमी

मुरुड : प्रतिनिधी

तालुक्यातील मजगाव येथून मुरुडकडे परतणारा पिकअप टेम्पो अचानक पलटी झाल्याने मुरुड कोळीवाड्यातील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच जणांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथे हलवण्यात आले आहे.

मुरुड कोळीवाडा येथील बेंजो पथकातील सहा वादक आपल्या सहकार्‍यांसोबत पिकअप टेम्पोतून मजगाव येथे एका हळदी समारंभात बेंजो वाजवण्यासाठी गेले होते.

मजगाव येथून शनिवारी (दि. 27) पहाटेच्या सुमारास मुरुडकडे परत येत असताना तालदेव चढणीच्या भागात चालकाचा ताबा सुटून त्यांचा पिकअप टेम्पो पलटी झाला.

या अपघातात टेम्पोतील दीपेश कासेकर, सौरभ जठारी, साहिल आगलावे, प्रथम वाघरे, सुयोग जठारी आणि नितेश आगलावे हे गंभीर जखमी झाले. त्यांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील पाच जखमींंना अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply