Breaking News

पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत

दीड महिन्यात 25 जणांना श्वानदंश; नागरिक भयभीत, स्थानिक प्रशासन हतबल

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील पाली गावात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. गेल्या दीड महिन्यात पालीतील तब्बल 25 जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला  आहे. त्यांच्यावर पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यामुळे विशेषत: लहान मुले, वृद्ध व महिलांत या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.

पाली हे अष्टविनायकांपैकी एक स्थान आहे. येथील बल्लाळेश्वराचे दर्शनासाठी रोज भाविक येत असतात. भटके कुत्रे टोळ्यांने पालीत फिरत असतात. त्यामुळे पालीतील नागरिकांसह भाविकांनादेखील या भटक्या कुत्र्यांचा धोका निर्माण झाला आहे. मात्र या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या निर्बिजीकरणासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व पशुवैद्यकीय विभागाकडून कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत.

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकताच श्वानदंश झालेल्या दोन रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर एका तरुणास अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जाणे पसंत केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply