पोलादपूर ः प्रतिनिधी
तालुक्यातील पैठण ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये रविवारी (दि. 12) प्रवेश केला. पैठणच्या सरपंच शीतल येरूणकर, उपसरपंच, सदस्य शारदा मोरे, सुनीता सावंत, अरूण दरेकर, अंकिता मोरे यांच्यासह इतर सदस्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी माजी राजिप सदस्या सुषमा गोगावले यांच्या हस्ते सरपंच शीतल येरूणकर यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभागप्रमुख सतीश शिंदे आदी उपस्थित होते. आमदार भरत गोगावले यांनी, पैठण, गोळेगणी आणि परसुले धरणासह अन्य विकासकामांचा ओघ या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आणणार असल्याचे जाहीर केले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …