Breaking News

ओएनजीसी दुर्घटनेतील शहिदांना श्रद्धांजली

उरण : रामप्रहर वृत्त

ओएनजीसीच्या उरण येथील प्रकल्पात दोन दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत शहीद झालेल्या चार जवानांना बुधवारी (दि. 4) वाशी येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी चौघांचेही शव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

उरण ओएनजीसी प्रकल्पात मंगळवारी स्फोट होऊन भीषण आग लागली होती. ही आग विझवण्याचा प्रयत्न करताना कंपनीचे अधिकारी सी. एन. राव, तसेच सीआयएसएफच्या अग्निशमन दलातील कॅप्टन ई. एन. नायका, एम. पासवान व सतीश कुशवाह असे एकूण चार जण शहीद  झाले. त्यांना वाशीतील सीआयएसएफ कॉलनी येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या ठिकाणी सीआयएसएफचे महानिरीक्षक सी. व्ही. आनंद, नीलिमा राणी, राजनाथ सिंह, विष्णू स्वरूप, विनोदकुमार चौरसिया, शीप्रा श्रीवास्तव, रुची आनंद व महेश पौडवाल आदी अधिकारी उपस्थित होते.

शहीद झालेल्यांपैकी अधिकारी राव यांच्यावर बुधवारी खारघर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर इतर तीन जवानांवर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या चार शहीद जवानांमुळे कंपनीच्या मालमत्तेसह लाखो जणांचे प्राण वाचण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांचे बलिदान व्यर्थ न जाता त्यांचा यथोचित गौरव व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार खासदार बारणेंच्या प्रचारार्थ खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य रोड शो

पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य …

Leave a Reply