Breaking News

मुख्याध्यापक जांभळे सेवानिवृत्त

नागोठणे : प्रतिनिधी

कोएसोच्या नागोठणे येथील कै. सरेमल प्र. जैन ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य तथा श्रीमती गुलाबबाई रा. अग्रवाल माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक केशव लखमा जांभळे 34 वर्षांच्या सेवेनंतर 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. मूळचे पेण तालुक्यातील डोलवी गावचे रहिवासी असणार्‍या जांभळे यांनी 1986 साली नागोठणेतील याच माध्यमिक शाळेतून शिक्षकीपेशाला प्रारंभ केला होता.मराठी तसेच भूगोल या विषयांचे तज्ञ असणारे जांभळे हे शिस्तप्रिय शिक्षक म्हणून जनमानसात ओळखले जात होते. 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी विविध शाळांमध्ये सेवा केल्यावर निवृत्तीपूर्वी अग्रवाल माध्यमिक शाळेत ते पर्यवेक्षक म्हणून पुन्हा एकदा रुजू झाले. गतवर्षी त्यांची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा अद्याप चालू झाल्या नसल्याने 30 जूनला काही शिक्षकांच्या उपस्थितीत त्यांचा निरोप समारंभ झाला

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply