पनवेल : रामप्रहर वृत्त : देवसागर साधक समाज (इंचगिरी संप्रदाय)तर्फे स्वानंद सुख निवासी श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर यांचा सहावा पुण्यस्मरण सोहळा शिवाजीनगर, गव्हाण, ता. पनवेल येथे होणार आहे. बुधवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता सोहळ्याला सुरुवात होऊन गुरुवारी (दि. 23) दुपारी 12 वाजता माऊलींवर पुष्पवृष्टी होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. या दरम्यान भजन, प्रवचन, जागर आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व नातेवाईक, गरुबंधू-भगिनींनी आवर्जून उपस्थिथ राहावे, असे आवाहन संयोजक माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …