नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त : पिण्याचा पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पनवेल परिसरात बांधकामांना परनानगी देऊ नये, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या पाण्याचा पुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असून, या परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे ते मिळणारे तुटपुंजे पाणीही बांधकामासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळते. याबाबत लोकप्रतिनिधींकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून, जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रात बांधकामांना परवानगी देऊ नका, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.