Breaking News

गोसिया मार्केटला आग; 50 ते 60 गाळे जळून खाक

पनवेल : वार्ताहर  : तळोजा परिसराला लागून असलेल्या दहिसर मोरी या गावाजवळील असलेल्या गोसिया मार्केटमधील अनधिकृत गाळ्यांना लाग लागली, या आगीमध्ये 50 ते 60 गाळे जळून खाक झाले आहेत.

आग विझविण्यासाठी कंळबोली, खारघर, सिडकोच्या अग्निशामक दलाच्या गाड्या, तळोजा अग्निशमन दलाच्या गाड्या अशा एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सदर आग  कोणत्या कारणाने लागली याचा तपास चालू झाला आहे. ही आग लागली की लावली हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दहिसर मोरी येथील असलेल्या गोसिया मार्केटला अचानक आग लागली. या मार्केटमध्ये अनेक गाळ्यांमध्ये बेकायदेशीर केमिकलचा साठा करून ठेवलेले ड्रम होते, भंगारचे अवैध साठे यामध्ये कागदी पुठ्ठा, प्लॅस्टिक, केमिकलच्या बॅगा, प्लॅस्टिकचे ड्रम, लाकडी गोडाऊन अशा प्रकारच्या असलेल्या गाळ्यांना आग लागली. या आगीमध्ये अशा प्रकारचे साहित्य जळून खाक झाले आहे.

या परिसरात अशा प्रकारच्या आगीच्या घटना अनेक वेळा घडत आहेत. दहिसर मोरी हे गाव नवी मुंबईच्या सीमेवर व मुंब्रा ठाणेच्या सीमेवर असल्याने दहिसर मोरी या परिसराला नेमका वाली कोण आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंब्रा शहराच्या हाकेवर असलेल्या गावाकडे मुंब्रा अग्निशामक दल दुर्लक्ष करीत आहेत. नेहमी या परिसरात आग लागली की तळोजा अग्निशामक, सिडको अग्निशमन दलालाच धावत जावे लागते. जे दहिसर मोरी या गावापासून लांब आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply