Breaking News

पनवेलमध्ये शिवजयंतीनिमित्त मराठा वेशभूषा स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. 19च्या वतीने रविवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रेनिमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा 15 वर्षांखालील मुलामुलींसाठी असून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धकांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नाव नोंदणीसाठी चिन्मय समेळ (8767149203) किंवा रोहित जगताप (8691930709) यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply