Breaking News

करंजाडे येथे घरफोडी करणारे दोघे ताब्यात

पनवेल : वार्ताहर
करंजाडे येथे घरातील दरवाज्याचे लॉक तोडून सोन्याचे बेसलेट व गॅस सिलिंडर चोरी करणार्‍या दोन आरोपींना तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
करंजाडे येथील तथास्तु इमारतीत घराचे दरवाज्याचे लॉक तोडून आत प्रवेश करून सात ग्राम वजनाचे सोन्याचे बेसलेट व 1 गॅस सिलिंडर चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार रवींद्र राऊत, नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पोलीस नाईक विनोद देशमुख, रवींद्र पारधी, पोलीस शिपाई प्रसाद घरत आदींच्या पथकाने सदर गुन्ह्यांचे ठिकाणी संशयित इसमांकडे चौकशी करून तसेच गुप्त बातमीदारांकडून आरोपींची माहिती काढली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपी शोएब कच्ची (वय 27) आणि विपुल रायकर (वय 28) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून पनवेल शहर पोलिसांनी चोरी केलेले 7 ग्राम वजनाची सोन्याचे बेसलेट व 1 गॅस सिलिंडर असा एकूण 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply