पनवेल ः रामप्रहर वृत्त
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी (दि. 19) पनवेलमध्ये महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी सहभागी होत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला अश्वारूढ पुतळा व टपाल नाका येथील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात, ढोल ताशा आणि लेझीमच्या गजरात भव्य मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, तहसीलदार विजय तळेकर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, राजेंद्र शर्मा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, रूचिता लोंढे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी, शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper