पनवेल : वार्ताहर
पनवेल रेल्वे स्थानक मालधक्का रोडवरून येत असताना तरुणांना रस्त्यामध्ये अडवून त्यांना धमकावून त्यांच्याकडून सोन्याची बाली व मोबाईल काढून घेणार्या तीन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेतील फिर्यादी विशाल दतू कांबळे व त्याचा मित्र संदिप शर्मा हे पनवेल रेल्वे स्टेशन येथून चालत मालधक्का रोड वरून येत असताना त्यांना रस्त्यामध्ये तीन तरुणांनी अडवून त्यांना धमकावत 1 सोन्याची बाली व 2 मोबाईल काढून घेतली.
याबाबत तरुणांनी पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार रवींद्र राऊत, नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पोलीस नाईक विनोद देशमुख, रवींद्र पारधी, पोलीस शिपाई प्रसाद घरत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने आरोपी तकदिर साळुंखे (वय 19), राजू धोत्रे उर्फ भाऊ (वय 19), आणि रोहित चव्हाण उर्फ बाबा (वय 19) या तीन तरुणांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.त्यांच्याकडून पनवेल शहर पोलिसांनी 32 हजार 600 रुपये किमतीचे 1 ग्राम वजनाची सोन्याची बाली व 2 मोबाईल जप्त केले आहे
Check Also
कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा
मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper