Breaking News

कामोठ्यात शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कामोठे : रामप्रहर वृत्त

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंत्ती सर्वत्र मोठ्या उत्साहात रविवारी (दि. 19) साजरी झाली. या जयंतीनिमित्त कामोठ्यामध्ये ‘एक शहर एक शोभायात्रा’ काढण्यात आली होती. या यात्रेला कामोठेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. ढोल ताशाच्या गजरात ही यात्रा कामोठे परिसरातून काढण्यात आली. या यात्रेत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. या वेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, उपाध्यक्ष राजेश म्हात्रे, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, माजी नगरसेविका कुसूम म्हात्रे, भाजप नेते रमेश तुपे, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्षा वनिता पाटील, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा विद्या तामखेडे, युवा नेते हॅप्पी सिंग, हर्षवर्धन पाटील, सुरेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, बेबीताई म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कामोठेवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, या वेळी सुवर्णा म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट देऊन शुभेच्छा देण्यात आली. याबद्दल त्यांनी आभार मानले.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply