खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 27) रसायनशास्त्र विभागातर्फे केम बॉण्ड फीस्टचा उद्घाटन समारंभ झाला. या उद्घाटन समारंभासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची संवाद साधला. या केम बॉण्ड फीस्टचा प्रमुख उद्देश रसायनशास्त्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना पिरॉडिक टेबलचे उपयोजन गमतीशीर पद्धतीने करता यावे हा होता. या केम बॉण्ड फिस्टचे आयोजन प्रा. महेश्वरी झिरपे (विभाग प्रमुख रसायनशास्त्र) यांनी केले. प्रा. नीलम लोहकरे प्रा. रूपाली नगारेकर व रसायनशास्त्रातील सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.