Breaking News

पनवेलमध्ये नागरी कामांना वेग

– महापालिकेमार्फत रस्त्यांचे डांबरीकरण आणि गटारांची कामे

– सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केला पाहणी दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागात अनेक नागरी विकासकामे सुरू आहेत. ही कामे जलदरित्या पूर्ण होण्यासाठी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह संबंधित प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका कामांची पाहणी करीत असतात. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 19 मधील म्हात्रे हॉस्पिटल परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि गटारांची कामे पनवेल महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर रविवारी (दि. 26) पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या कामांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणीवेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर आदी पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी, कामगार उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply