मुरूड तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत

मुरूड ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर मुरूड तालुक्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज कर्मचारी व अभियंत्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन मुरूड तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तालुक्यातील सर्व गावांना सुरळीत वीजपुरवठा होत आहे. आता फक्त डोंगराळ व जिथे खूपच पडझड झाली तेवढाच भाग अंधारात असून तेथील वीजपुरवठाही तातडीने सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुरूड वीज महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी केले आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर महावितरणची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी त्यांची विशेष भेट घेऊन तालुक्याच्या वीज परिस्थितीचा आढावा घेतला असता त्यांनी ही माहिती दिली.

निसर्ग चक्रीवादळाचा सर्वांत मोठा फटका मुरूड तालुक्याला बसला. मोठमोठी झाडे, झाडांच्या फांद्या वीजवाहिन्या व ट्रान्सफार्मरवर पडल्याने लघुदाब व उच्चदाब वाहिनीचे एक हजार 500 पोल पडले आहेत. आतापर्यंत एक हजार पोलचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित कामसुद्धा युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली

पडलेले पोल व वीजवाहिन्या दुरुस्त करून अवघ्या 17 दिवसांच्या प्रचंड मेहनतीनंतर 20 जूनला मुरूड येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. 27 जूनपर्यंत तालुक्यातील ग्रामीण भागाचा 90 टक्के वीजपुरवठा सुरळीत केला होता.

वादळात महावितरणच्या 600 पोलचे नुकसान झाले, परंतु वरिष्ठ कार्यालयाने तातडीने 700 पोल उपलब्ध करून दिल्याने कोणतीही समस्या उद्भवली नाही. भांडूप परिमंडळ मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण व पेण येथील अधीक्षक अभियंता डी. आर. पाटील यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे मनुष्यबळ व वीजसाहित्य वेळेत उपलब्ध झाल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आम्हाला यश आल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.

मुरूडमध्ये आमचे 25 हजार वीजग्राहक आहेत. आता ग्राहकांना जे वीज बिल मिळणार आहे ते एप्रिल, मे व जूनचे असणार आहे. तीन महिन्यांचे एव्हरेज बिल संगणक प्रणालीप्रमाणे मिळणार आहे. ग्राहकांनी तीन महिन्यांचे बिल एकदाच भरल्यास दोन टक्क्यांचा फायदा पुढील बिलात देण्यात येणार आहे. जे ग्राहक तीन महिन्यांचे बिल एकदाच भरू शकत नाहीत, त्यांना दोन किंवा तीन हप्त्यात वीज बिल भरण्याची मुभा देण्यात येणार आहे. तीन महिन्यांचे वीज बिल देताना प्रत्येक महिन्याचा वापर लक्षात घेऊन त्याप्रमाणेच बिल दिले जाणार आहे. पोल व वीज वाहिन्यांचे काम पूर्ववत करण्यासाठी वीज कर्मचार्‍यांसह असंख्य ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल येरेकर यांनी सर्वांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

Check Also

Parece ist dadurch dennoch gangbar, welches Piepen uff gunstgewerblerin andere Art oder Stil lohnen hinter zulassen

Tanke Supermarkt (Aldi) Drogerie (Rossmann) Postfiliale Spati (keineswegs samtliche, aber mehrere) Erreichbar, amplitudenmodulation einfachsten in …

Leave a Reply