लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत 27 ते 28 फेबु्रवारी दरम्यान केंद्र स्तरीय कला क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या महोत्सवात गव्हाण केंद्रातील 10 शाळांमधील 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 28) झाले. रायगड जिल्हा परिचदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत 27 ते 28 फेबु्रवारी दरम्यान केंद्र स्तरीय कला क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात गव्हाण केंद्रातील 10 शाळांमधील 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपले कलाकौशल्य सादर केले. या महोत्सवादरम्यान सोमवारी झालेल्या क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले तर मंगळवारी झालेल्या बैद्धीक व सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे ज्येष्ठनेते वाय. टी. देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, रघुनाथ देशमुख, प्रकाश कडू यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महोत्सवामध्ये झालेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव केला.