पनवेल : रामप्रहर वृत्त
गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर कुटुंबियांच्या निवासस्थानी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर (पोस्ट-गव्हाण) निवासस्थानी पाच दिवसांच्या श्रीगणेशाचे आगमन झाले आहे. त्या अनुषंगाने सोमवारी श्री सत्यनारायण महापूजाचे व सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त समस्त भाविक, नागरिकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व कुटुंबीयांनी केले आहे.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …