Breaking News

चाकूचा धाक दाखवून पादचार्‍यास लुटले

त्रिकुट गजाआड; पनवेल शहर पोलिसांची कारवाई

पनवेल ः वार्ताहर 

एका पादचारी व्यक्तीला तीन अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून नऊ हजार 600 रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेल्याची घटना पनवेल शहर परिसरात घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन आरोपींना अवघ्या एका तासात अटक केली आहे.  फिर्यादी बजरंग पवार (वय 22) हे पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडून पायी जात असताना आरोपी साहील धोत्रे, प्रथम जाधव, डेविड जोसेफ या त्रिकुटाने आपसात संगणमत करून त्यांना हाताबुक्याने मारहाण केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील नऊ हजार 600 रुपये आणि मोबाईल चोरून ते पसार झाले होते. याबाबत त्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, हवालदार रविंद्र राऊत, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पोलीस नाईक रविंद्र पारधी, विनोद देशमुख, शिपाई प्रसाद घरत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवुन गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासद्वारे अवघ्या एका तासात तीनही आरोपींना गुन्ह्यातील मुद्देमालासह ताब्यात घेते आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply