Breaking News

भारतीय युद्धनौका दक्षिण चिनी समुद्रात; ‘ड्रॅगन’ अस्वस्थ

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने दक्षिण चिनी समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले गेले आहे. गलवानमधील हिंसक संघर्षात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर नौदलाने आपली एक आघाडीवरील युद्धनौका (फ्रंटलाइन वॉरशिप) दक्षिण चिनी समुद्रात तैनात केली आहे. भारतीय नौदलाच्या या कृतीमुळे चीनमध्ये अस्वस्थता पसरली आहे. चीन सरकारसाठी दक्षिण समुद्राचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. या भागात इतर कोणत्याही देशाची उपस्थिती चीनला पसंत नाही. चिनी नौदल पीपल्स लिबरेशन आर्मीचा विरोध डावलून भारताची युद्धनौका आपल्या अमेरिकेच्या समकक्षाच्या सतत संपर्कात आहे. अमेरिकेची जहाजेदेखील या भागात आहेत.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply