Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जीवनचरित्र ग्रंथाचे सातारा येथे प्रकाशन

सातारा : रामप्रहर वृत्त
पुण्यपुरुष प्राचार्य शंकरराव उनउने उर्फ बापू यांच्या जीवनचरित्र ग्रंथाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) सातारा येथे करण्यात आले. संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये हा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, बापूंचा आदर्श घेऊन मी शिकलेलो आहे, असे प्रतिपादन केले.
प्रा. डी. ए. माने यांनी पुण्यपुरुष प्राचार्य शंकरराव उनउने उर्फ बापू यांच्या जीवनचरित्र ग्रंथाचे लेखन केले असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. सांगली जिल्ह्यातील रा. शा. माने पाटील विद्यामंदिर व सिनियर अ‍ॅग्री कॉलेजला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला ‘रयत’चे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, लेखक प्रा. डी. ए. माने, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, डॉ. विजय उनउने, मिनल उनउने, प्राचार्य डॉ. आर. डी. गायकवाड, वसंत सावंत, प्राचार्य आर. के. शिंदे, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील, विसापूरचे सरपंच अशोक मोहिते, उपसरपंच अशोक अमृतसागर, माजी सरपंच दिलीप माने, ग्रामपंचायत सदस्य विलास माळी, भास्कर माने, तासगाव सुतगिरणीचे चेअरमन पतंग माने, संपत माने, प्रमोद अमृतसागर, प्रकाश माने, प्राचार्य भगवान माने, दत्तात्रय माने, बळी चव्हाण, शरद माने आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, ‘रयत’चे संस्थापक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी शाळा-कॉलेज काढले नसते तर मी घडलो नसतो, असे सांगत शिक्षण घेत असताना मला मिळालेला रयत माऊली हा पुरस्कार माझ्यासाठी खासदारकीपेक्षाही महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply